價格:免費
更新日期:2018-09-08
檔案大小:1.7M
目前版本:2.0.2
版本需求:Android 5.0 以上版本
官方網站:http://www.aplive24.com
Email:info@aplive24.com
聯絡地址:隱私權政策
प्रसारमाध्यमे नव्या क्षितिजांचा वेध घेत असल्यामुळे विविध नवनवी माध्यम आपल्याला साद घालत आहेत.वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या,
सोशल मिडियाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वांतत्र्याच्या कक्षा विस्तारत आहेत. या अभिव्यक्ती स्वांतत्र्याला विचारांच्या भरारीचे पंख मिळावेत म्हणूनच आम्ही प्रसारमाध्यमातील एक नवा प्रयोग अपणासाठी आणत आहोत.
आज सर्वच वृत्तपत्रे,वृतवाहिन्या ऑनलाइन जगात वावरत असताना राजकीय, सामाजिक, एतिहासिक,
धार्मिकदृष्टया आगळे-वेगळे महत्व प्राप्त असलेले अहमदनगर व् पुणे हे दोन महत्वाचे जिल्हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही APLive 24 अर्थात Ahmednager-PuneLive24 हा प्रयोग तुमच्या पाठबळावर सुरु करत आहोत. APLive24 हे न्यूज पोर्टल सर्वांसाठी हक्काचे विचारपीठ राहणार आहे.सोशल मिडियाशी निगडित हा अंत्यत अभिनव व् वेगळा प्रयोग आहे. आजच्या गतिमान व् वेगवान स्पर्धेच्या युगात नव्या पिढीला सर्व काही अचूक व् तितक्याच् वेगाने हव आहे. नव्या पीढ़ीची ही गरज ओळखून व् जुन्या पिढीची अभिरुची जपत या नव्या जुन्याचा मेळ घालणार आहोत.
अहमदनगर व् पुणे जिल्ह्याची बित्तंमबात, राजकीय-सामाजिक घडामोडी, विश्लेष्णासहित आपल्या पर्यन्त पोहचवणार आहोतच पण त्याचसोबत सम्पूर्ण राज्याच्या अन् देश-विदेशातील घटनाचाही आढावा घेताना त्यावर तुम्हाला आपली मत, विचार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळणार आहे. म्हणूनच हे ऑनलाइन वृत्तपत्र तुम्हाला तुमच हक्काच् विचारपीठ वाटणार आहे.
अन्याय व् अनिष्ठ रूढ़ी परंपरेवर प्रहार करताना सामाजिक दातृत्वाचे भानही आम्ही ठेवणार आहोत. समाजातील उपेक्षीत, वंचित दिन दुबळ्यांचा आवाज बनण्याचे सामर्थ्य तुमच्या साथीने व् साक्षीने प्राप्त करणार आहोत. शहरीकरणाच्या विस्तारीकरणाचा अचूक वेध घेताना दुर्गम खेड्यातील हरवलेल्या वाटांचा शोधही घेणार आहोत.
माध्यम ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न रहाता तिने समाजाला नवी दिशा द्यावी, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी द्यावी. सामाजिक चळवळीना जनाधार मिळवून देताना एक विचारपीठ बनाव, उपेक्षीत -वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी ही अन अशी सारीच् पत्रकारितेची व्रत व् वसा आम्ही प्रामणिकपणे जपणार आहोत. प्रत्येक राजकीय घडामोडीचा वेध घेताना कुणाच्याही हातचे बाहुले व् मुखपत्र न बनता निपक्षपणे विश्लेषण हाच आमचा अंजेडा असणार आहे.
शिक्षण, शेती, आरोग्य यासारखे मुलुभूत प्रश्न आमच्या ऐरणीवर असतील. हे नव पाऊल टाकताना आमची कुणाशीच स्पर्धा नसेल. आम्ही स्पर्धा करू ती फक्त आमच्याशीच्...आम्हाला सतत ध्यास असेल स्वतः ला सशक्त व् सक्षम बनवत आम जनतेला हक्काच् विचारपीठ प्राप्त करून देण्याच्...म्हणूनच APLive24 पत्रकारितेतला एक नवा मापदंड आपल्या पाठबळावर ठरणार आहे, यात संदेह नाही.