價格:免費
更新日期:2019-10-18
檔案大小:3.0M
目前版本:0.0.3
版本需求:Android 4.4 以上版本
官方網站:https://www.cssstylekit.com/
Email:marathibooks7@gmail.com
聯絡地址:Sr. No 38, Mathura Colony, Rahatani, Pune 411017 INDIA
शिवकालीन दिनविशेष | शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजीचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजीच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे
कान्होजी जेधे
बाजीप्रभू देशपांडे
मुरारबाजी देशपांडे
नेताजी पालकर
बाजी पासलकर
जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे.
तानाजी मालुसरे
हंबीरराव मोहिते
शिवाजी महाराजांचे सरसेनापती
नेताजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
खंडेराव कदम
ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
छत्रपति शिवाजी महाराज (लेखक - दि.वि. काळे)
छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)
झुंज नियतीशी (अनुवादित, अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी - Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - A Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)
डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (२०१७)
मराठा-स्वराज्य संस्थापक श्रीशिवाजी महाराज (१९३२); लेखक - चिंतामण विनायक वैद्य
राजा शिवछत्रपती (लेखक - ब.मो. पुरंदरे, १९६५)
छत्रपती शिवाजी महाराज' प्रकाशन १९७० मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पूर्वार्ध व उत्तरार्ध,पृष्ठसंख्या १२००) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)
श्री राजा शिवछत्रपती-खंड १ & २, (गजानन भास्कर मेहेंदळे)
शककर्ते शिवराय, खंद १ आणि २ (१९८२) लेखक - विजय देशमुख : (हिंदी अ्नुवादसुद्धा उपलब्ध)
शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १ व २ : भारत इतिहास संशोधक मंडळ
शिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)
शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)
शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (३री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
Shivaji - The Great Guerrilla (R..D. Palsokar)
Shivaji - ((सर यदुनाथ सरकार)
शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)
Chatrapati Shivaji Maharaj was the founder of the Maratha Empire in western India. He is considered to be one of the greatest warriors of his time and even today, stories of his exploits are narrated as a part of the folklore. With his valor and great administrative skills, Shivaji carved out an enclave from the declining Adilshahi sultanate of Bijapur. It eventually became the genesis of the Maratha Empire. After establishing his rule, Shivaji implemented a competent and progressive administration with the help of a disciplined military and well-established administrative set-up. Shivaji is well-known for his innovative military tactics that centered around non-conventional methods leveraging strategic factors like geography, speed, and surprise to defeat his more powerful enemies.