價格:免費
更新日期:2017-12-09
檔案大小:3.1M
目前版本:2.1.0
版本需求:Android 4.1 以上版本
官方網站:http://www.dhanlabh.in
Email:mail@vinaysamant.com
聯絡地址:隱私權政策
नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) स्थापनेमध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा एका मराठी माणसाचा आहे ज्याचे नाव आहे रामचंद्र पाटील. ज्या NSDL मुळे शेअर मार्केटमध्ये डिलिव्हरी सोपी आणि जोखीममुक्त झाली त्या NSDL चे पहिले व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर भावे हे होते, आणि तेही मराठीच! विशेष म्हणजे त्यांनी भारतीय शासकीय सेवेतील नोकरी सोडून NSDL मध्ये जाणे पसंत केले होते. अशा दोन दिग्गज मराठी माणसांनी शेअर बाजाराला नवीन दिशा दिली आहे पण यामध्ये मराठी माणूस मात्र रिता राहिला याचे दुःखं आहे.
मराठी संस्कृतीचा सर्वात वाईट गुण म्हणजे संपत्त्ति निर्मितीस कमी लेखणे. पैसे कमावणे हे जणू पापच आहे आणि न कमावणारेच थोर आहेत असे संस्कार मराठी मनावर लहानपणापासूनच होतात. परिणामी जर कोणी पैसे मिळवणारा वा मिळवताना दिसला की तो भानगडबाजच असणार अशी खात्री मराठी मनामनात आपोआपच होते. त्यामुळे देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ या मराठी राज्याच्या राजधानीत असूनही मराठी पावलं काही त्याच्याकडे वळली नाहीत. आणि मराठी माणूस त्या बाजारास सट्टाबाजार म्हणून खिजवत आपले नैतिक दारिद्र्य मिरवत राहिला. पण आता ही परीस्थिती बदलण्यासाठी व मराठी माणसाचा सूप्त विवेक जागवण्यासाठी शेअर मार्केट व म्युचुअल फंड ह्या अर्थशास्त्र निगडीत विषयांवर "मराठीत" शास्त्रशुद्ध सल्ला देणारी www.dhanlabh.in ही वेबासाइट व मोबाइल अॅप आपल्या सेवेत सादर अर्पण.