價格:免費
更新日期:2018-05-18
檔案大小:2.9M
目前版本:1.0
版本需求:Android 2.1 以上版本
官方網站:https://www.dhananjaymaharajmore.com/
Email:more.dd819@gmail.com
聯絡地址:धनंजय महाराज मोरे (B.A./D.J./D.I.T.) मु. मांगवाडी (मंगलवाडी) पोस्ट भर तालुका रिसोड जिल्हा वाशीम (विदर्भ) पिन 444506 +919422938199---+919823334438---+919604270004 Dhananjay Maharaj More AT. Mangwadi (Mangalwadi) Post. Bhar. TQ. Risod Dist. Washim (Vidarbh) Pin 444506
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अमृतानुभव ग्रंथ
महाराष्ट्रात अनेक संत होउन गेले. संतांची परंपरा अकराव्या शतकापासून आहे. सर्व संतांनी उपदेशपर लेखन केले. पूर्वी सर्व ज्ञान संस्कृत भाषेत होते. जनता अशिक्षीत होती. भगवद्गीता मराठीत नव्हती. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे कार्य वयाच्या सोळाव्या वर्षी केले. भगवद्गीतेचे प्राकृत भाषेत भाषांतरीत "ज्ञानेश्वरी" ग्रंथ लिहीला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ होत.
महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आणि गुरुंच्या चरणी अर्पण करून आशीर्वाद मागितला. त्यावर निवृत्तीनाथ म्हणाले,"हा ग्रंथ तर उष्टा आहे. तू तर फक्त भाषांतर केलेस, यात तू काय केलेस. मी तुला का आशिर्वाद द्यावा?" यावर गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून महाराजांनी उपदेशपर दुसरा ग्रंथ लिहीला आणि तो हाच अमृतानुभव ग्रंथ. हा ग्रंथ वाचला असता अमृत प्राशन केल्याचा आनंद मिळतो.
अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्विलासानंद असेही नाव आहे.